पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१२९] गोष्ट मागील अनुभव, सध्याच्या स्थितीचे ज्ञान आणि एकं- दर वस्तुस्थितीचे परीक्षण या पुराव्यांवरून सिद्ध होतें. आतां हे मनांत आलेले वैराग्यजनक विचार येथे नमुद केले आहेत ह्मणून हा संसार अति कष्टमय आहे व सर्व ऐहिक व्य. वहार क्षणिक आहेत याकरितां सर्वसंगपरित्यागकरून सर्वांनी अवधूत वृत्ति स्वीकारून रात्रंदिवस टाळ कुटीत बसावें व- धन्योहं धन्योहं तृप्तेमकोपमा भवेल्लोके । धन्योहं धन्योहं धन्यो धन्यः पुनःपुनर्धन्यः ॥ अर्थ-'मी धन्यधन्य मोठा माझ्या तृप्तीस नाहिहो उपमा । कोठवरी वर्णावी आता मी पावलों स्वसुख- धामा' अशा नित्यतप्तस्थितीचा प्रापंचिकांस उपदेश करण्याचा आमचा उद्देश नाही, व तसे करण्यापासून यच्चावत लौकिक व्यवहार बंद पडतील. जमनाबाईराणीवर पतिवियोग, राज्याधिकारवियोग, कन्यावियोग, इत्यादि अवघड अवघड प्रसंग गुजरले. तशा प्रसंगी थोडासा वेळ ईश्वरचिंतनाकडे देऊन बाकीचे आयुष्य उद्योगवृद्धिची ब जीवित्वाची सार्थकता करण्याचा बोध व धडा या च. रित्रांतून सर्वांनी घेण्यासारखा आहे. सृष्टीतील एकंदर घडामोड व पदार्थमात्र आपापल्या प्रकाराने आपल्य खऱ्या स्थितीचा बोध करीत असतात. या क्षणभंगुर वीतभर आयुष्यात आपल्या हातन काय होणार आहे असे निराशेचे विचार मनात येऊ देणे अज्ञानमूलक होय. कारण, या बाईच्या हातून जी काही परोपकाराची व देशहिताची कामें झाली ती ध्यानात आणिली झणजे तिचे आयुष्य थोडे होते व ती अकाली मरण पावली असें मानण्याचे कारण राहत नाही.