पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाई मोठी हुशार व चतुर होती. तिने मोठ्या आदर्बान किंचित् थट्टेने लागलेच उत्तर केलें कीं,-' होय, पण हा जो आपण बायकांचा एकदम शिरच्छेद केला त्याचे योग्य कारण समजण्यापुरतें तरी त्या विषयाचे बायकांना ज्ञान असले पाहिजे असे मला वाटते.' या मार्मिक उत्तराने बादशहाच्या मनावर चांगलाच ठसा उमटला असेल हे सांगावयास नकोच. काही स्त्रिया प्रसंग पडल्यास राजकीय गोष्टींत कशा तरबेज होतात व कसे बुद्धिवर्चस्व दाखवि० तात हे या चरित्रावरून कळून येईल. या जगांत कोणी श्रीमंत असो, वा गरीब असो; सर्व सुखसंपन्न असा प्राणी कोणीही व कोठेही आढळावयाचा नाही. श्रीमंती जरी पुष्कळ असली तरी श्रीमंतीपासूनही संपूर्ण सौख्य मिळत नाही. खाण्यापिण्याची व ऐषआरा- माची ददात नसली तर तिसरीच कांहीं उगीव असते. बरें गरिबीत सुख असेल असें ह्मणावें तर ला स्थितीतले लोकही जीवावर उदार झालेले व संसारास कंटाळलेले आढळतात. एवंच, श्रीमंत व गरीब या दोन्ही अवस्थांतील लोकांची स्थिति सारखीच भासते. प्राचीन व अर्वाचीन स्त्रीपुरुषांची चरित्रे आपणांस हाच बोध करतात की, सं- पूर्ण सुख असें या जगांत मुळीच नाही. आपापल्या वस्तुस्थितीची एकंदर हकीकत ध्यानात आणिली आता प्रथम आपल्याला असे वाटते की, अमुक साधनें आपल्या स्वाधीन झाली असतां पुढे आपण सुखी होऊ. त्याप्रमाणे ती साधनें जरी स्वाधीन झाली तथापि मनांत घरल्याप्नमाणे निम्यानेही नव्या वस्तुस्थितीपासून सुख होत नाही. ही