पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१२७] एकाद्याचा उत्कर्ष होण्यास चेहऱ्यावरील तेजस्विता कारणीभूत होते. प्रसिद्ध वीर पुरुष व स्त्रिया यांची चित्रे व तसबिरा काढून पहा. ती बहुधा तेजःपुंज असावयाची. जमनाबाईराणांच्या चेहेऱ्याकडे पाहतांच तिचे वर्चस्व पाहून मन सुप्रसन्न व थक्क होत असे. तिच्याबद्दल आदर व वंद्यभाव उत्पन्न होत असे. आता ती आपल्याला प्रत्यक्ष दिसावयाची नाही, तथापि तिच्या चित्राकडे पाहिले तरी तेच भाव मनांत उभे राहतात. तिच्या बाल्यावस्थेतच रहिमतपुरच्या एका साधु पुरुषाने तिच्या मुखचर्येवरून व गोड भाषणावरून भाकीत केले होते की, ही मुलगी पुढे मोठ्या पदवीस चढ़न कीर्तिमान होईल. ते त्याचे भाकीत अक्षरशः खरे ठरले. मुखचर्या तेजस्वी, डोळे पाणीदार, कांति मनोहर आणि भाषण मधुर, ही महत्वास चढण्याची प्रसादचिन्हें होत. ही लक्षणे या बाईमध्ये असून शिवाय चौकसपणा, देश काल वर्तमान ध्यानांत आणून तदनुसार आपल्या कृतीचे धोरण बांधण्याचे सामर्थ्य, धैर्य, कर्तबगारी, कंटकपणा, साधी रीत, सरळ आणि प्रसंगास अनुरूप असें भाषण करण्याची संवय, थोडीशी विद्या आणि बहुश्रुतपणा, इतके गुण तिच्या अंगी होते. स्टील या नावाची एक रशियन बाई होती. तिच्याशी फ्रान्सू देशाचा पहिला नेपोलियन बादशाह एकदां बोलत असतां तिला ह्मणाला-'कायहो, राजकीय गोष्टीत बाय- कांना काय समजणार आहे ? त्या काय चुलीपुढच्या गोष्टी आहेत ? ज्याचे आपल्याला बिलकुल गम्य नाही अशा विषयांत बायकांनी आपले डोके घालू नये. ती स्टील