पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१२६] ने) दृष्टीस पडतात, तेथे माझा विशेष अंश आहे असे समज. हे गुण बन्याच अंशी जमनाबाईराणीत होते, सबब तिचें चरि- वरूपी चित्र काढून हा विभूतिपूजेचा अल्प यत्न केला आहे. कधी की अंशभूत विभूति जन्मास येतात त्या काल, देश, वर्तमान व परिस्थिति यांस अनुसरून असतात. काही अंतस्थ दैवी प्रेरणा होऊन परमेश्वर कधी कधी कांहीं विभूतींच्या हातून अनेक आकारांनी, प्रकारांनी व साधनांनी मानव- जातीचे हित करीत असतो. अशा सर्व विभूतींच्या अंगी एकसारखेच गुण असतात असे नाही. कोणी राज्यकार्यात कुशल, कोणी दानशूर, कोणी युद्धकलानिपुण, कोणी साधु, कोणी लेखक, कोणी इश्वरोपासक, कोणी कवि, तर कोणी सुभार्या होतात. प्रत्येक विभूतीमध्ये काहींना काही ठळक गुण दृष्टीस पडतात. स्वदेशप्रीति, भूतदया, बंधु- प्रीति, राज्यकारभाराचे धोरण, परोपकार, इत्यादि बरेच गुण या बाईच्या चरित्रांतून घेण्यासारखे आहेत. मनुष्याची क- सोटी पाहण्यासाठी कधीकधी त्याच्या मार्गात संकटे आड येतात. त्यांतून धैर्याने त्यांचे कसे निवारण करावे हे यांत शिकण्यासारखें आहे. अशा विभति या जगांतले तेजाचे झरे होत. या स्वाभाविक वाहणाज्या झांपाशींच मनुष्यपणा वास करीत असतो. त्याचा सहवास फार आनंदकारक असतो. आजपर्यंत ज्याज्या इतिहासप्रसिद्ध स्त्रिया होऊन गेल्या त्यांना त्यांना जे काही महत्व देण्यांत आलें, अगर येत आहे ते केवळ त्यांच्या अंगच्या गुणाधिक्यामुळेच होय. ज्या मानाने जे सद्गुण ज्या व्यक्तींत कमीअधिक मानाने आढळतात त्या मानाने ती व्यक्ति कमीअधिकमानाने प्रकाशांत आलेली असते,अगर येते.