पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१२९] खंड २८. आमचे दोन शब्द. या थोर बाईचे हे लहानसें चरित्र मागच्या खंडांतच संपलें. आतां या खंडांत आमचे काय झणणे आहे ते कळवून ठेवितों. पौराणीक काली ज्या महान महान सत्या होऊन गेल्या स्या सोडून दिल्या तरी अर्वाचीन काली जिजाबाई, अहि- ल्याबाई, राधाबाई, गोपिकाबाई, लक्ष्मीबाई, इत्यादि प्रसिद्ध राजस्त्रिया होऊन गेल्या त्यांमध्ये बऱ्याच अंशी या बाईची गणना करण्यासारखी आहे. आईबाप होण्याचे काम एकपक्षी सोपे आहे, पण मा. पली जबाबदारी पुरी पाडण्याचे कर्तृत्व व ज्ञान थोड्या मातापितरांत असते. तसले व्यावहारीक ज्ञान असले तरी सशील व सुजाण आईबापांच्या पोटी नेहमी सर्वच मुले सुशीक व नामांकित, व वाईट आईबापांच्या पोटी सर्वच मुळे द्वाड व दुर्गुणी निपजतात असा निग्म नाही. आप्पा- साहेब माने व बजुबाई यांना चार अपत्ये झाली. त्यांतून एक तान्हीबाई (जमनाबाई) मात्र नावारूपास आली. तिर्ने रहिमतपुरकर मान्यांचे जुने घराणे अधिक मानास्पद केले. भगवद्गीतेत श्रीकृष्णानी सांगितले आहे की, जी जी वस्तु ऐश्वर्ययुक्त, शोभायुक्त, किंवा काहीतरी प्रभावाने युक्त असेल ती ती माझ्या तेजाच्या अंशापासून झाली आहे, असें जाण. आणखी दुसन्या ठिकाणी सांगितले आहे की, कीर्ति-लक्ष्मी-वाणी-स्मृती-मेधा-धृती आणि क्षमा हे गुण