पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १२२] मंत्रिमंडलबळ घेउनी स्वहाती, राज्यसूत्रे चाळीत स्वयें होती । दूरदर्शी ती राजनीति जाणे, राज्यतृष्णा स्वप्निही कधी नेणे, तिच्या योगें आझांस हा सुकाळ, सुगुणमंडित हा लाभला नृपाळ ॥ प्रबल दुःखाची परंपरा झाली, मृदुल तनुला क्षीणता फार आली, अमृत वाटुनि शशिकला द्वितीयेची, तशी दिसली कृश तनू त्या सतीची ।। अशुभ वार्ता ऐकिली अस्तमानी, दुःखशोकाकुल पौर हळहळोनी, राजसदनाभोंवतीं जमा झाले, शोकसिंधूला पूर जणूं आले ॥ कुणी दैवाला दोष लाविताती, कुणी ह्मणती रे काय यमा केलें ! तिला ठेवुनि त्वां आह्मां का न नेलें!॥ दानधर्मे संतुष्ट दीन केले, पुण्यकम दिन जिने घालवीले, तिच्या आत्म्याला तुझ्याजवळ देवा, सदा सौख्यद सहवास तो घडावा ॥