पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १२१] प्रजेला सुखकर होईल. महाराजसाहेबांना सन १८१२ सालापासून राज्याचा पूर्ण अधिकार मिळाला आहे. त्यांच्या शिरी आजपर्यंत मासाहेबांचे छत्र होतें तें नाहींसें झाले आहे. तथापि त्यांना मिळालेल्या शिक्षणाचा टेका आहे तो अडचण पडू देणार नाही. राजमाताविरह' या सदराखाली सयाजीविजयाच्या जादापत्रकांत 'दत्त' या सहीने त्या वेळेस एक कविता प्रसिद्ध झाली तीत मासाहेबांचे वृत्त गोषवान्याने दिले आहे ते अर्से- 'थोर मानेकलि जन्म जिचा झाला, रूप लावण्ये लाजवी लतेला, वर्ष तेरावे लागतांच तीला, पट्टराज्ञी अभिषेक पहा झाला ॥ प्रेम अनुपम पतिपदी असे जीचें, तिर्थे दिसलें सुख तिला सुरपुरीचें, अशा आनंदें सखद पांच वर्ष, पांच घटिकेसम घालविली हर्षे । जया प्राणाधिक गणित असे राणी, जया देवासम पूज्य सदा मानी, तोच राजा हरपला अकस्मात, अहा! झाला काळोख त्रिभुवनांत । प्रजापालनकर्तव्यदक्ष माय, शोक हालाहल बळ गिळुनि जाय,