पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१२० नंतर सयाजीरावमहाराज यांस राज्याधिकार मिळाल्या. वर मासाहेबांची सुमारे १४ वर्षे ईश्वरचिंतन, भजन व तीर्थयात्रा यांत गेली. पुढे त्यांच्यावर कन्यावियोगाचा घाला पखला. ताराबाबांना ऐन तारुण्यांत एकाएकी का. ळाने ओढून नेले. या असह्य दुःखानें मासाहेबांचे शरीर क्षीण होत चाललें. पढ़ें दीडदोन वर्षांतच त्यांचा अंत झाला. मासाहेब कैलासघासी झाल्यावर सयाजीरावमहाराजांकडून राज्यांतील गोरगरीबांस कपडे वाटण्यांत आले. दानधर्म बराच झाला. मासाहेबांच्या काही बाळमैत्रिणी होत्या त्यांची नांवें मानकरी मंडळांत दाखल करून त्यांना नेमणुका बांधून दिल्या. मासाहेबांच्या जेष्ठ भगिनि खाशीबाईसाहेब हरपळे यांना काही नेमणूक बांधून दिली. मासाहेबांच्या श्रीतारकेश्वरच्या देवस्थानाकडे पूजा, नैवेद्य, उत्साह, वगैरे- बद्दल सालाची कायमची नेमणूक बांधून दिली. त्यांच्या स्मरणार्थ एक मोठी रकम निराळी ठेवून तिच्या व्याजांतून नवीन ग्रंथांना उत्तेजन देण्याचे ठरले आहे असे समजतें. शिवाजीमहाराजांची मातुश्री जिजाबाई, तुकोजी होळ- करांची मातुश्री अहिल्याबाई, थोरले माधवराव यांची मा- तुश्री गोपिकाबाई, इत्यादि इतिहासप्रसिद्ध माता होऊन गेल्या. तशाच योग्यतेच्या मातुश्री जमनाबाईसाहेब होत्या. त्यांच्या नजरेखाली महाराजांना सर्व प्रकारचे सुशिक्षण मिळाले आहे तें मासाहेबांच्या पश्चातही गायकबाडी