पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[११९] डंबरी कायम आहेत. ती तेथें पाहवयास मिळतात. सोन्याच्या समया राहिल्या नाहीत. खंडेराव महाराजां- नी दोन चांदीच्या तोफा ओतविल्या होत्या. पुढे म. ल्हारराव महाराजांनी आपल्या कारकीर्दीत समया अटवून त्यांत सोन्याची जास्त भर घालन दोन सोन्याच्या तोफत ओतविल्या त्या अद्यापि कायम आहेत. चांदीसोन्याच्या चार तोफा बॉडीगार्डच्या पहाांत ठेविल्या आहेत. त्या दसरा वगैरेच्या मोठ्या स्वाऱ्यापुढे शोभेकरितां चालवितात. असो, खंडेराव महाराज कैलासवासी झाल्यावर मा- साहेबांचें स्थित्यंतर होऊन सुमारे चार वर्षे त्यांनी पुण्यास राहून काढली. तेथे त्यांना कोणत्याही प्रका. रची सत्ता नव्हती. बडोद्यास राहूम जी सत्ता व ने स्वातं- व्य असावयाचें तें त्यांना तेथे नव्हते. ताराबाबाकडे पाहू. नच त्यांना तिकडचे दिवस कंठावे लागले. नंतर अनुकूल दशा प्राप्त होतांच त्या बडोद्यास परत आल्या, मुलगा मांडीवर दत्तक घेऊन त्या राजसत्तेचा उप- भोग घेऊ लागल्या. पतिवियोगाचें असह्य दुःख झाले होते, तरी दानधर्म, पोथीपुराण, पुजाअर्चा, ईश्वरभजन, रा- ज्यकारभाराची सल्लामसलत यांत त्यांची सात वर्षे नि- घून गेली. या अवधीत सयाजीरावमहाराज व ताराबाबा यांचे लग्नसमारंभ झाले, इंग्रजसरकाराकडून 'क्रौन ऑफ इंडिया' हा बहुमानाचा चांद मिळाला, काशीयात्रा झाली, बडोद्यास श्रीतारकेश्वर देवाची स्थापना झाली, इत्यादि ठळक ठळक गोष्टी घडल्या.