पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिजवर जडावाचे कळाकुसरीचे काम केले आहे. ही तयार करण्याकडे लाखो रुपये खर्च झाले आहेत. खर्चाचा नक्की आंकडा कळला नाही. ही चादर पूर्णतेस जाण्याच्या अगोदरच खंडेराव महा- रान कैलासवासी झाले. त्या वेळेस मासाहेब गरोदर होत्या. दोन मास झाले होते, त्यांच्या देखत मासाहेबांना कदाचित् पुत्र होता तर ही अप्रतिम चादर ब्यागदादच्या पौराकडे खाना झालीच असती. परंतु तसा योग बनून न आल्या- मुळे तयार झालेली चादर राजवाड्यांतच कायम राहिली, नाही तर आपण या चादरीला मुकलों असतो. हिचे सगळे क्षेत्रफळ ३२४ फूट होतें. ही मुंबईपर्यंत जाऊन आली आहे. बड् साहेबांनी हिचे यथातथ्य वर्णन लिहून ठेविलें आहे. भडोच व अमदाबाद येथे देशी कारागि- रीची प्रदर्शने झाली त्यांत ही मांडून ठेवण्यासाठी पाठवि- ण्यात आली होती. हीत इकडच्या देशी कारागिरांनी काळाकुसरीचे काम इतकें उत्तम केले होते की, ते पाहुन युरोषियन शिल्पकलाभिज्ञ लोकांनी तोंडात बोटे घातली. व्यावरून हिंदुस्तानांत प्राचीन काली कलाकौशल्याचे ज्ञान शिखरास पोहोंचलें होतें अशी त्यांची खातरी झाली. त्या- बद्दलची अद्यापि या देशांत शेकडों प्रमाणे मिळतात. ही चादर हली नजरबागवाड्यांत जवाहीरखान्यांत ठे- विली आहे. हिचे काही भाग, सोन्याचे कळस व मेघ-