पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खंड २७. d गोषवारा. मासाहेबांचे देहावसान झाले त्यावेळेस त्यांना पंचेचा- ळीस वर्षे होती. या पंचेचाळीस वर्षांचा आढावा काढला तर त्यांची पहिली तेराचवदा वर्षे माहेरी खेळण्यांत व गृह- शिक्षणांत गेली. पुढे लग्न झाल्यावर खंडेराव महाराज पांच- सहा वर्षेच होते. त्यांनी जमनाबाई साहेबांच्या पोटी पुत्र व्हावा ह्मणून ब्यागदादच्या हजरत पीरनशा पीराला नवस करून त्याला अर्पण करण्यासाठी एक रत्नखचित चादर तयार करविली होती. तिचा मासाहेबांशी संबंध पोहोचतो ह्मणून तिच्यासंबंधाची थोडीशी माहिती येथे देणे अवश्यक आहे. ही चादर करण्याचे काम संवत् १९२२ पासून चालले होते. चादरीचें मेघडंबरीसुद्धा भाग ७, चार बाबूंचे सो- न्याचे कळस ४, व सोन्याच्या समया २ इतका चादरीचा सरंजाम होता. हिरा, पाच, माणीक, नीळ, पुष्कराज, मोती यांनी ती गंफलेली असल्यामुळे तेजःपुंज दिसते. हिजवर काढलेकी वेलबुट्टी, सोन्याची चकाकी, मोत्यांचे पाणी व रत्नांची प्रभा नेत्राला फारच आनंद देणारी आहे. ती उघड्या मैदानांत उन्हांत पसरून पाहिली तर ही एक सौंदर्याची तेजोमय मसच ओतलेली आहे असा भास होतो.