पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[११४ 'महाराणी जमनाबाईसाहेब ह्या प्रस्तुत काली एका हिंदु राजाच्या प्रख्यात राणीसाहबे असून त्या परलोक- वासी झाल्या. त्या जात्या बऱ्याच बुद्धिमान होत्या, यामुळे बडोद्याच्या राज्यकारभारांत त्यांच्या हाती जी साधनें होती त्यांच्या साह्याने राजकीय व सामाजिक गोष्टीत त्यांनी आ. पर्ले नाव करवेल तितकें चिरस्थायी करून ठेविलें आहे. त्यांनी राज्यकारभारांतून आपलें अंग काढून घेतल्यावरही पुष्कळ दिवसपर्यंत कित्येक खात्यांत त्यांची वजनदारी का- यम राहिली होती. त्यांच्याविषयी लोकांची स्वाभिमान- वृत्ति पुष्कळ दिवस होती. लोकांची अशी वृत्ति हिंदुस्तानांत कोणत्याही राजघराण्यातील स्त्रीविषयों फार- शी आढळण्यांत येत नाही. त्या राणीपद पावल्यावर त्यांच्या तारुण्यदशेत त्यांच्यावर कैक संकट कोसळली होती, यामुळे त्यांच्याविषयी प्रजाजनांत में प्रेम व जी पूज्यबुद्धि उत्पन्न झाली होती ती अलीकडे अलीकडे जरी मागे पडली होती, तरी त्या खंडेराव महाराजांच्या प्रिय राणीसाहेब या नात्याने लोकांच्या मनांत जो भक्तिभाव वसत होता तो त्यांच्या अंतकालपर्यंत कायम होता.' असो, मनुष्य गतप्राण झाल्यावर त्याच्या शरीराचा माग- च्या लोकांना काही उपयोग होत नाही. त्याने जीवंत असतांनाच स्वसामर्थ्यानुरूप काही सत्कृत्ये, पुण्यकमें व भूतदयेची कामें केली असली तर मात्र त्याची कीर्ति मागे राहते. मनुष्येतर पशुपक्षि जीवंत अ.