पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[११] सतांना त्यांजकडून परोपकार घडतात व मेल्यावरही अस्थि, मांस, चर्मादिकांच्या योगाने ते उपयोगी पडतात. काहींची हडकें, काहींची शिंगे, काहींचे केंस, काहींचे मांस, काहींचें कांतडे, काहींचों नखें, काहींची विष्टामत्र, काही- चे पंख, काहींचें वमन व उच्छिष्ट, हे सर्व पदार्थ मनु- व्यांना उपयोगी आहेत. हस्तिदंती फण्या, सोंगी व बुदबळे; गव्याच्या शिगांची अभिषेकपात्रे; हस्तिदंती दे- व्हारे, चाकु, सुज्या आणि इतर हत्यारे व छत्र्या यांच्या मुठी; हे सर्व जिन्नस हडकांचे होतात. देवांच्या मूर्ति व देवांवर घातलेले सोने रुपे व मोती यांचे अलंकार ज्या कुंच- ल्पानी साफ करतात ते कुंचले रानडुकराच्या केसांचे असतात. देवांवर व राजेलोकांवर वारावयाच्या चवऱ्या वन- गाईच्या शेपटाच्या असतात. गंगावन, कस्तुरि, गोरोचन, कृष्णाजिन, कडासन, व्याघ्रांबर, पायांतले जोडे, जीन, सांबरी टोप्या व पिशव्या, वाघनखें, किरमिजी रंग, मेण, रेशीम, मोर्चेल, गोमय, गोमत्र, मध, दूध, इत्यादि पदार्थ आपणांस कोण पुरवितात, याचा विचार केला ह्मणजे देहाची व आत्म्याची फारकत झाली ह्मणजे मनुष्याचा मृतदेह कशाच्याही उपयोगी पडत नाही. त्याने जीवंत असतांनाच काही सत्कृत्ये करून ठेवावी लागतात. रामदा- सानी झटले आहे की- 'देहे त्यागिता कीर्ति मार्ग उराधी, मना सजना हेचि क्रीया धरावी.'