पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुशिक्षित व प्रेमळ राज्यकर्त्यांच्या अमलाखाली शांततेच्या व सुधारणेच्या रूपाने आमी अनुभवित आहों. श्रीमंत मातोश्री महाराणी जमनाबाईसाहेब आपल्या अनेक सद्गुणांमुळे सर्व प्रजाजनास प्रत्यक्ष जननीपेक्षाही अधिक प्रिय झालेल्या होत्या, व त्यांच्या अकाली मृत्यूची वार्ता समजल्यापासून समस्त प्रजाजन दुःखमग्न झालेला आहे, आणि सर्व जातींचे व सर्व धर्माचे लहान थोर, श्रीमंत गरीब, सर्व लोक राजघराण्यावर आलेल्या ह्या प्रसं- गाबद्दल हळहळत आहेत. श्रीमंत महाराज सरकारांवर आ- लेल्या ह्या दःखाचे वांटेकरी सर्व प्रजाजन होत आहेत, आह्मांस उमेद आहे. शहर सुधराई कचेरी, बडोदें, ता. ६-१२-९८. अध्यक्ष व सभासद यांच्या सह्या. मासिक पुस्तकाचा फेब्रुवारी १८९९ चा अंक ३३८ यांत दरभंग्याचे महाराज, प्रसिद्ध टिप्पुसुलतानाच्या वंशापैकी महंमद बैरामशाह, शीक सरदार गुरु मुखसिंग इत्यादि गृहस्थांबद्दल मृत्युलेख आले आहेत, त्यांतच महाराणी जम- नाबाईसाहेब यांच्याबद्दल इंडियन् स्पेक्टेटरांतून उतारा घेतला आहे, त्यांतील सारांश खाली लिहिल्याप्रमाणे आहे:-