पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[११२] दर्शनार्थ महाराजसाहेब यांजकडे एक दुखवट्याचे पत्र पाठविण्याचे सर्वानुमते ठरले, ते पत्र खाली लिहिल्या प्रमाणे:- श्री. श्रीमंत सरकार सयाजीराव महाराज गायकवाड, सेनाखासखेल समशेर बहादुर, राज्य बडोदें. आही बडोदें शहरसुधराईचे अध्यक्ष व सभासद श्रीमंत महाराज सरकारच्या चरणांजवळ विनंति करण्याची रजा मागतो:- श्रीमती मातोश्री महाराणी जमनाबाईसाहेब, सी. आय, यांच्या अकाली मृत्यूने श्रीमंत महाराजसाहेबांच्या घराण्यावर दुःखाचा पर्वत कोसळला आहे. अशा प्रसंगी श्रीमंत महाराजांचे समस्त प्रजाजन या दुःखाचे वांटेकरी आहेत, अशी विनंति श्रीमंत महाराजांचे चरणी केल्यास श्रीमंत महाराजांचा दुःखभार हलका होईल अशी आह्मांस आशा आहे. प्रिय मातोश्री महाराणी जमनाबाईसाहेब यांचें नांव ह्या संस्थानच्याच काय; पण, सर्व हिंदुस्तानच्या इतिहासांत जी राज्यधोरणी माणसे होऊन गेली त्यांच्या यादीत नोंद- ण्यासारखी कामगिरी त्यांनी आपल्या हयातीत बजाविली आहे, आणि लिचेंच फळ श्रीमंत महाराजांसारख्या सूज्ञ,