पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

GENERAL TERALLIBAAR [१११॥ खंड २६. दुखवटा. reOTOMOON थोर पदवीला चढलेल्या मनुष्याची चित्रे, चरित्र, मा- नपत्रे, इमारती इत्यादि वस्तु त्याची स्मारकें होत. तसेंच मृत्यूनंतर त्याच्या वारसांकडे आलेली पत्रे व वर्तमानपत्रे आणि मासिकें यांत छापून प्रसिद्ध झालेले मृत्युलेख, हीही मृताची स्मारकेंच होत. एका कवीने झटले आहे की, 'कीर्तिरक्षरसंबद्धा स्थिरा भवति भूतले' ह्मणने अक्षरांनी बद्ध झालेली कीर्ति भूतलावर चिरस्थायी होऊन रहाते. मासा- हेबांचे देहावसान झाल्याचें वर्तमान कळतांच राजेरजवाडे, अमीरउमराव व बडेबडे सरदार यांजकडून महाराजसाहेब यांजकडे दुखवट्याची पत्रे व तारा काही दिवस येत होत्या. त्यांत सर्वांनी मासाहेबांच्या मृत्यूबद्दल दुःख प्रदर्शित करून त्यांचे गुणानुवाद गाइले होते. ग्वाल्हेर, कोल्हापूर, सावंत- वाडी, देवास, इंदर इत्यादि संस्थानांतून संस्थानचे मान- करी दुखवटे घेऊन आले होते. दुखवट्याचे सर्व लेख येथे देण्यास जागा नाही, तथापि एक दोन लेखांचा उतारा देतो, त्यांघरून इतर लेखांची कल्पना करता येईल. बडोदे येथे सधराई कचेरीच्या भव्य दिवाणखान्यांत तारीख ५ डिसेंबर १८९८ रोजी सुधराईच्या सभासदांची एक असाधारण सभा भरली होती. त्यावेळी दुःखप्र-