पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१०९] याप्रमाणे माने व गायकवाड या उभय कुलांनां भूष- विणाऱ्या मासाहेब निघून गेल्या. त्यांचे परोपकारी बर्तन, चातुर्य, औदार्य व राज्यकार्यधुरंधरता हे गुण लोक त्यांच्यामागे स्मरत आहेत. मेलेल्याचे शरीर स्मशानांत भस्म होऊन जाते. द्रव्यवानाचे द्रव्य येथेच राहते. शूराची कीर्ति या लोकीच वास करिते. बरोबर कोणी काही घेऊन जात नाही. शेवटी लोकांची सगळी आरडाओरड व विलाप मृत झालेल्या शवा- साठी. त्या शवाचा ज्याच्या त्याच्या परिस्थितीप्रमाणे लाग. लाच निकाल लागतो. प्राण निघून गेल्यावर शवाची कशीही पाठवणी करा, अंतरात्म्याला त्याचे काहीच नाही. बाप्र- संगावर एका कवीने मटलें आहे तें असें- 'चेतोहरा युवतयः स्वजनोऽनुकूलः, सद्वांधवाः प्रणयनम्रगिरस्तु भृत्याः। वलगंति दंतिनिवहास्तरलास्तुरंगाः, संमीलने नयनयोनहि किंचिदस्ति.॥' ह्मणजे सुंदर स्त्रिया, आप्त, इष्ट, बंधुजन, सेवक, हत्ति, घोडे, हे सर्व वैभव डोळे उघडे आहेत तोपर्यंतच; डोळे मिटले की काही नाही. तात्पर्य, मागचे लोक चांगला हणतील असें वर्तन ठेवणे एवढेच प्रत्येकाचे काम आहे. जो आपल्या शरीराची मात्र काळजी घेतो आणि आपल्या पारलौकिक कल्याणाची हयगय करतो त्याचे नांव मागें न राहता तो पारमार्थिक