पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१०८) टीखासपागा, बॉडीगार्ड, फत्तेसिंग पलटण, हुजुरातपागा, उलट्या बंदुका धरलेली तिसरी व चौथी पलटण, खालसा- शिबंदी, आरब बेहेडा, वगैरे सर्व कारखान्यांचे लोक मि- सलीने चालले. ब्यांडवाले व देशी वाजंत्री लोक उलटा बाज्या वाजवीत चालले. महाराजसाहेब पालखीबरोबर पायींपायींच गेले. त्यांच्या मागून सरदार, दरकदार, कामदार वगैरे मंडळी चालली. मोतीबागेपासून केदारेश्वरच्या स्मशानभूमिपर्यंत लहान मोठे, श्रीमंत गरीब, बायका पुरुष, मुले व मुली मासाहेबांच्या शवाचे दर्शन घेण्यासाठी पालखीची वाट पाहात उभी राहिली होती. रात्री नऊ वाजतां स्वच्छ चांदण्यांतून व मशालींच्या उजेडांतून पालखी जात असतां राजमार्गात दुतर्फा उभा राहिलेला प्रेक्षकजन दीर्घ सुसकारे टाकीत होता. पालखी केदारेश्वरी दहा वाजण्याच्या सुमारास पोहों- चली. तेथें राळ, कापूर, चंदनादी सुगंधि द्रव्यांनी चिता रचली होती. तिजवर शव ठेविल्यावर महाराजसाहेबांनी चितेला अग्नि दिला. त्यावेळेस एजंटसाहेब व असिस्टंट एजंटसाहेब यांनी आपल्या टोप्या काढून राणीसरका- रच्या तर्फे मृतास मान दिला. विश्वामित्रीच्या पलाजवळ पलटणीच्या लोकांनी बंदुकांच्या तीन तीन फैरी झाडल्या. व तोफखान्याने पंचेचाळीस बारांची सलामी दिली. नंतर सर्व लोक आपापल्या घरी गेले. बडोद्यांतील सर्व कचेन्या, शाळा व कारखाने पांच दिवस बंद होते. शहरची दुकानें तीन दिवस बंद होती.