पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१०७] लास राजवाड्याजवळ मोतीबाग बंगल्यात त्यांचे प्राणी- स्क्रमण झाले. कार्तिक महिन्याचे पूर्वार्ध संपतांच इंग्रजी नोवेंबर महिन्याच्या अखेरीस व मंगळवारचा दिवस माव. ळण्याच्या सुमारास हा अनाथांचा आधारस्तंभ ढासळला. दिवाण, मुख्य मुख्य कामदार, सरदार, दरकदार, मानकरी, वगैरे मंडळी खिन्नमुख झाली होती. राधा- बाई साहेब, रेऊबाई साहेब, संतुबाई साहेब, लक्ष्मीबाई साहेब, गोजराबाई माने, नर्मदाबाई काळे, खाशीबाई हरपळे, वगैरे आप्त स्वकीय, खाशा स्त्रिया, व यमुनाबाई दुगल, काशीबाई मालेगांवकर, वगैरे बाळमैत्रिणी सन्निध बसल्या होत्या. त्यांच्या शोकानें मोतीबाग बंगला व्यापून गेला. त्यासमयीं त्यांच्या आयुष्याचे पूर्वार्धही पुरें झालें नव्हते. कबिरांनी झटले आहे की:- 'जब तुम पैदा भये, जग हासे तुम रोये, अबू तोभी ऐसा चलो के जग रोये तुम हासे' या साधुउक्तीप्रमाणे मासाहेबांनी अंतकाली परिवार- जनाका दुःखांत लोटून आपण परलोकी गेल्या. ही अशुभवार्ता लागलीच चोहीकडे पसरली. शहरांतले लोक हाय हाय करीत मोतीबागेकडे धावत सुटले. तेथे लोकांची अतिशय गर्दी झाली. स्मशान यात्रे- ची सर्व तयारी झाली. स्नानदानादि उत्तर क्रियेचे आद्यविधि संपल्यावर मासाहेबांचे शव पालखीत ठेविलें. स्वतः महाराजसाहेबांनी काही पावले मातुश्रींच्या पाल. खीला खांदा दिला. पालखीच्या पुढे मोठी खासपागा, छो-