Jump to content

पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करता याला काय ह्मणावें?' अशा दोन विवेकाच्या व समजुतीच्या गोष्टी सांगून बुवांची चित्तवृत्ति त्यानी ताळ्यावर आणिली. मग त्यांजकडून फलाहार करवून बरोबर एक म- नुष्य देऊन त्यांची त्यांनी बडोद्यास रवानगी केली. किती तरी थोरपणा हा! आश्रित जनाची केवढी कळकळ ! यालाच हणावें प्रसंगावधान आणि हिचेच नांव भूतदया! असे त्यांच्या हृदयमार्दवाचे चटके पुष्कळ आहेत, पण ते सर्व देत गेलो तर पुस्तकाचा बराच भाग त्यांनीच भरून जाईल, याकरितां एवढ्याच गोष्टी देऊन हे खंड पुरे करितों." तारण का PISy.hd PEDIJH 15