पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०४] बर दुःखाच्या अतिरेकानें बुवांचा कंठ दाटून आला. त्यांच्या डोळ्यांतून झरकन् पाणी आले व तोंडांतून अक्षर निघेना. मासाहेबांचेही डोळे अश्रूनों डबडबले. दोघांच्या तोंडाला कुलूप ठोकल्यासारखें झालें, जिव्हां बोलण्यासाठी पुढे सर. सावते. तो डोळे एकमेकाशी दृष्टादृष्टीने बोलू लागले. मासाहेबांची प्रियकन्या ताराबाबा नुकतीच सांवतवाडीस वारली होती. तें दुःख त्यांच्या हृदयाला अद्यापि पोळीत होते, तरी शेवटी मासाहेबांनीच पुढाकार घेऊन बोलण्याल आरंभ केला तो असा-बोवा, यावेळेस मी तुमचे व तुही माझें शांतवन करावे असे असतां तुझी खि- न्नवदन होऊन बसला तर माझें शांतवन कोण करील? सुखदुःखाचा दुसरा कोणी वाटेकरी असला तर सुख दुणावत व दुःख उणें होतें असें ह्मणतात. त्याची आतां प्रचीती पहावयाची आहे. आपण उभयतां या वेळेस सम- दुःखी आहो. किंबहुना, मी अधिक दुःखी आहे, तरी दोघांच्या दुःखाला वांटेकरी आहेत अशी मनाला शांति ठेविली पाहिजे,' असे त्यांनी समाधान केले. तरी बुवांनी मान खाली घातली होती ती ते वर करीनात. धोतराच्या पदरांत मस्तक घेऊन ते हुंदके देत होते, त्यांच्या दुःखाला व शोकाला वाचा फुटेना तेव्हा मासाहेब पुन्हां ह्मणाल्या-'मी बायको मनुष्य असून माझ्या दुःखाचें गांठो. मी आपल्याजवळ घट्ट बांधून ठेविलें आणि तुही विद्वान, वेदांति व पोक्त वयाचे हरिदास असून सामान्य जनाप्रमाणे दुःख