पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मराठे घरण्यांत ज्या कित्येक लोकोत्तर स्त्रिया होऊन गेल्या, त्यांची नाममात्रही ओळख असण्याचा महाराष्ट्रवाचकांस संभव नाही. ह्या स्त्रियांची चरित्रे फार अपूर्व, मनोरंजक व वाचनयाग्य आहेत. छत्रपति शिवाजी महाराज ह्यांचे सापत्न बंधु व्यंकोजी महाराज ह्यांचा वंश, लॉर्ड डलहौसी साहेबांची गदा एतद्देशीय संस्थानावर फिरेतों- पर्यंत, तंजावर येथे सुखाने नांदत होता. ह्या तंजावरच्या राजघरा- ण्यांत खुद्द व्यंकोजी महाराजांची पत्नि दीपाबाई व त्यांचीच नात सून सुजानबाई ह्या फार चतुर व राजकारणी स्त्रिया होऊन गेल्या. ह्यापैकी पहिलीने आपल्या यजमानांस उपदेश करून त्यांचे व शिवाजी महाराजांचे सख्य करून दिले. बायकोच्या योगाने बंधुबंधुमध्ये वैमनस्य उत्पन्न होते असा जगांत साधारण अनुभव आहे. परंतु बायकोने नवऱ्यास ताळ्यावर आणून, त्याचेच नव्हे तर त्याच्या सर्व राज्याचे कल्याण केल्याचे उदाहरण मराठ्यांच्या इतिहासांत हेच पहिले असेल. ह्या स्त्रीच्या शहाणपणाची तारीफ खुद्द शिवाजी महाराज यांनी केली असून, तिच्या चोळीपातळाकरितां एक लाखाची स्वतंत्र जहागीर त्यांनी तोडून दिली होती. अर्थात् पुण्यश्लोक शिवनृपतीने जिचा इतका गौरव केला, व जिच्या शहाणपणाची प्रशंसा केली, तिची थोरवी किती तरी असामान्य असली पाहिजे? दीपाबाईप्रमाणेच सुजानबाई हीहि फार राजकारणपटु व चतुर स्त्री होती. हिने आपला नवरा मृत्यु पावतांच, त्याच्या पश्चात् आलेल्या संकटपरंपरेस न जुमानतां, तंजावरचे राज्य काही दिवस उत्तम रीतीने चालविले. परंतु इतिहासाच्या अभावामुळे ही सर्व दिव्य रत्ने विस्मतीच्या घट्ट आवरणाने झांकून गेली आहेत. ती लोकांपुढे चरित्ररूपाने प्रकाशित झाली तर केवढी बहार होईल? तंजावरच्या राण्यांप्रमाणे गुत्तीकर मुरारराव घोरपड्याच्या बाय- कोची विशेष कीर्ति ऐकण्यांत येते. तिचेही चरित्र उपलब्ध होणे अवश्य आहे. महाराष्ट्रापासून अलग झालेल्या दक्षिणेतील महाराष्ट्र- घराण्याप्रमाणे उत्तर हिंदुस्थानांतील-विशेबेंकरून बुंदेलखंडांतील- महाराष्ट्रीय घराण्यांतही काही लोकोत्तर स्त्रिया निपजल्याचे दृष्टोत्पतीस