पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जत गाजत पुण्यनगरांत प्रवेश करणारी कृष्णराव महादेव चासकर ह्यांची विधवा स्त्री रखमाबाई; बळवंतराव रास्त्यास रावबाजीच्या के- देंतून सोडवून एका रात्रीत साठ कोस घोब्याचा प्रवास करणारी धैर्यशालिनी कृष्णाबाई; सर जॉन मॉलकम ह्यांच्या सारख्या रणपटु आंग्लयोद्धयासही आश्चर्यचकित करणारी यशवंतराव होळकराची मुलगी भीमाबाई ह्या स्त्रिया किती तरी लोकोत्तर असल्या पाहिजेत ? ह्यांची चरित्रे वीररसाने ओथंबलेली असून ती वाचली असतां महा- राष्ट्र स्त्रिया किती तेजस्वी होत्या, त्यांच्या अंगी किती सद्गुण होते, आणि त्यांची योग्यता 'न स्त्री स्वातंत्र्यमहति' ह्या श्रुतीसही कशी हरताळ लावीत होती, हे चांगळे व्यक्त होईल ह्यांत शंका नाही. परंतु इतिहासाभावामुळे त्यांची माहिती व माहमा सामान्य वाचकांस समजणे अगदी दुरापास्त झाले आहे. अशा स्त्रिया इंग्लंडसारख्या देशांत जन्मल्या असत्या, तर तेथील स्वाभिमानी लोकांनी त्यांचे फार फार पोवाडे गाइले असते, व चरित्रकारांनी त्यांची सुंदर सुंदर वर्णने लिहन त्यांच्या रसमय गोड कथांनी स्वभाषेचें ग्रंथभांडार सजविलें भसते !! वरील स्त्रियांच्या केवळ बरोबरीच्या नसल्या तरी त्यांच्या वर्गात गणण्यास योग्य अशा इतर स्त्रियाही आणखी पुष्कळ मराठे घरा- ण्यांत निपजल्या आहेत; परंतु चरित्राच्या अभावामुळे त्यांची माहिती विशेष प्रसिद्ध नाही. ग्वाल्हेरची बायजाबाई शिंदे, धा- रची मैनाबाई पोवार, चिंतामणराव आप्पा पटवर्धनांची बाणे- द्वार पनि, आणि इंदूर येथील प्रख्यात किबे घराण्यांतील दानशर व राजकारणी रखमाबाई, ह्यांची चरित्रे कमी महत्वाची होतील काय लिहिण्यास आनंद वाटतों की, श्रीमती रखमाबाई मादेब किबे ह्यांचे संक्षिप्त चरित्र किचे घराण्यांतील एका सुशिक्षित रावतीने "ग्रंथमाले"मध्ये नुकतेच प्रसिद्ध केले आहे. वर सांगितलेल्या प्रसिद्ध स्त्रिया महाराष्ट्रामध्ये शौर्यपराक्रमादि मनीं विख्यात् झालेल्या ऐतिहासिक घराण्यांतील असल्यामुळे पांची माहिती-निदान नाममात्र तरी-महाराष्ट्रवाचकांस असण्याचा संभव आहे. परंतु महाराष्ट्रापासून दूर असलेल्या अशा इतिहासप्रसिद्ध