पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१०३] क्तीचा गुण मोठा होता. स्वतःच्या अनुभवाने गतभर्तृका स्त्रियांची स्थिति किती दयाजनक असते हे त्यांनी थोड- क्यांत व्यक्त करून दाखविलें. prone गोष्ट तिसरी. सन् १८९७ साली बडोद्यास प्लेगची भयंकर साथ आली होती. बडोद्याच्या आसपासही प्लेग फार जोरानें चालू होता. कोणाचा कोणाला घटकेचा भरंवसा वाटेनासा झाला होता. त्यावेळेस बडोद्याच्या एका नामांकित हरिदा- साचे दोन होतकरू पुत्र प्लेगनें एकाएकी मरण पावले. त्यावेळेस कुटुंबाच्या माणसांना घेऊन बुवांना रानांत राह- ण्याचा प्रसंग आला! 12 मासाहेब त्यावेळेस बडोद्यापासून चार कोसांवर केळण- पर ह्मणन गांव आहे तेथे राहण्यासाठी गेल्या होत्या. तेथे त्यांना बुवांवर आलेला प्रसंग कळला. हे वर्तमान ऐकून त्यांना फारच दुःख झाले. त्यांचे आपल्याकडून होईल तितकें शांतवन करावे ह्मणून त्यांनी आपल्या पदरचा एक भला व पोक्त गृहस्थ बुवांस बोलावून आणण्याकरितां पाठविला. त्याने जाऊन मासाहेबांचा निरोप कळविला; पण, बुवा पुत्रशोकाने फारच कष्टी असल्यामुळे ते मासाहेबांचे भेटीस जाण्यास कबूल होईनात. शेवटी एक थर पदवीचा गृ. हस्थ मध्ये पडून बुवांची आगगाडीमार्गे केळणपुरास रखा. नगी केली. त्यांची व मासाहेबांची समक्ष भेट होण्याबरो-