पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाहून त्यांना त्याचा फार कळवळा आला. मग त्या झ- णाल्या-'बोवाचे क्लेश माझ्याने पाहवत नाहीत. काही उत्तरें अजून राहिली असली तरी आतां खेळ बंद करा.' प्रयोगाचे काम सुमारे तीन तास चालले होते. मग एक शा. लजोडी, रोकड बिदागी व लेखी दाखला देऊन मासाहेबांनी त्याचा सत्कार केला. या हकीक़तीवरून त्यांचे हृदय किती कनवाळु होते हे स्पष्ट दिसून येते. ज्याचा आत्मा सदय व बुद्धि तीव्र त्याच्या मनावर भूतदयेचा अंमल लागलाच बसतो. दुःखाची कल्पना मनांत उतरल्याबरोबर आपलें व दुसज्याचे तादात्म्य होणे यांतच परोपकारबुद्धीचे मूळ बीज आहे, हे तात्पर्य या गोष्टींतून निघते. -THEPIES गोष्ट दसरी.S EPTORY "श्रावणमासांतील एका सोमवारी प्रदोषकाली श्री तार• केश्वरी हंडयाझंबरांची आरास केली होती. श्री पुढे हरि. दासाचे कीर्तन चालले होते. एका बाजूला मासाहेब श्रीशं. कराची पूजा करीत बसल्या होत्या. देवदर्शनार्थ शहरांतील बायकापुरुषांचे थवे लोटले होते. तो समारंभ आटपल्यावर काही ठळक ठळक मंडळी मुजरा करून मासाहेबांकडे बोलत बसली, तेव्हां देवदर्शनास आलेल्या लोकांच्या दाटीविषयी तेथे गोष्ट निघाली. मासाहेब ह्मणाल्या- आजच्या समाजांत सुवासिनी बायांपेक्षा माझ्यासारख्या रांडा- वलेल्या बायाच फार दिसल्या. हे शब्द त्यांच्या मुखांतून मोठ्या कळवळ्याने बाहेर पडले. त्यांच्या भाषणांत स्पष्टो-