पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१०१] 5 खंड २४. हृदयमादेव. . मासाहेबांच्या हृदयमार्दवाच्या गोष्टी पुष्कळांच्या तोंडी अनेक आहेत; पण, त्यांपैकी काही या ठिकाणी देतो. FDMR गोष्ट पहिली. मासाहेबांना सोंगट्या, बुद्धिबळे व दशावतारी गंजिफा चांगल्या खेळतां येत होत्या. सुमारे तीन चार वर्षांपूर्वी कर्ना- टक देशचा कृष्णदिक्षित या नांवाचा एक अष्टावधानी बोवा बडोद्यास आला होता. त्याला तीसपस्तीसपर्यंत अवधाने एकदम चालवितां येत होती. त्याचे बुद्धिसामर्थ्य व धारणा- शक्ति विलक्षण होती. त्याच्या अवधानांचा प्रयोग एक दिवस मासाहेबांपुढे तारकेश्वरी झाला. अवधानीबोवांचा प्र- योग सुरू झाल्यावर गंजिफा, बुद्धिबळे व सोंगट्यांचे डावही ते दुरून सांगत होते, गंजिफांची पानें मासाहेबांनी आ. पल्या हाती घेतली होती. त्यांतून अमुक अमुक पाने टाका असें बोवा विचार करून सांगत, मग मासाहेब ती ती पाने टाकीत. शेवटी मासाहेबानींच डाव जिंकला, व सर्व प्रश्नांची उत्तरेही बरोबर पटली; पण, प्रश्नांची उत्तरें बस- वितांना व डाव सांगतांना अवधानीबोवांचे चित्त व्यग्र होऊन त्याच्या मुखचर्येवर अनेक विकार व क्लेश होत होते. ते मासाहेबांच्याने पाहवेनात. बोवाला. त्रास होत असलेला