पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १०० परंत, पढ़ें दिवाळीच्या सुमारास प्रकृतीचें मान फारच बिघडत चालले, तेव्हां मासाहेब आपल्या सन्निध असाव्या ह्मणन महाराजसाहेबांनी त्यांना कक्ष्मीविलास राजवाड्या- नजीक मोतीबाग बंगल्यांत नेले. तेथे महाराजसाहेब वरचे. वर त्यांच्या समाचारास जात होते. वैद्यांचे औषधोपचारही चालू होते. वनस्पतींचे वर्णन लिहिणाराला वनस्पतींचे बीजारोपण, उद्गम, संवर्धन, विकास, पुष्पधारण आणि फलनिष्पत्ति, इत्यादि परंपरांचे फार सूक्ष्म अवलोकन करावे लागते, आणि एकीपासून दुसरी स्थिति कशी परिणत होते हैं क्रमाने दाखवावे लागते. तसेंच मानसशास्त्रयानेही भिन्न भिन्न व्यक्तीची विचारपरंपरा ओळीनें लक्षात आणावी लागते. त्याच रीतीने चरित्रलेखकानेही ज्याचें चरित्र हाती घेतले असेल त्याच्या जन्मकालापासून अंतकालापर्यंत ज्या ज्या गोष्टी घडल्या असतील त्या त्या क्रमशः व संगतवार टिपून ठेवाव्या लागतात. मासाहेबांच्या जीवन- वृत्तांताचा क्रम येथपर्यंत आह्मीं आणन पोहोंचविला. आता यापुढची हकीकत याच धोरणाने पुढील खंडांत येईल. NERALHARA T ARIFHTOS MATPOrgs. 3 सावजानकाचा