पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९९] असल्यामुळे त्या प्रत्यक्ष मोदवृत्तापुढे आमच्या ऐकिव माहि. तीची मातबरी नाही. याप्रमाणे वाईकडील तीर्थयात्रा व दानधर्म आटपून तारीख २७ आक्टोबर १८९८ रोजी मासाहेब वाईहून बडो- द्याकडे येण्यासाठी निघाल्या. त्या दिवशी रस्त्यांत त्यांच्या जिवावरचे एक मोठे भरिष्ट टळले. वाईहून वाठार स्टेशन सुमारे वीस सैल आहे. दरम्यान शिरगांवचा एक मोठा घाट आहे. तो फोडून तेथे बैलगाड्या, घोडयांच्या गाड्या व तांगे जाण्यासारखा नागमोडी सडकेचा रस्ता केलेला आहे. तेथील चढण फार बिकट आहे. घाटांत मोठमोठे नाले असून तेथें पूल बांधलेले आ- हेत, व कोठे कोठे सडकेच्या दोन्ही बाजूला, अगर एका बाजूला भयंकर कडे तुटलेले आहेत. सडकेच्या बाजूला लहान लहान दगड उभे केलेले आहेत. त्या ठिकाणी घोडे व बैल बिचकून जाऊन कैक घोडे, बैलगाड्या व माणसे यांना कधी कधी अपघात होतात. याच घोटां- तून मासाहेबांची घोड्यांची गाडी वाठाराकडे जात असतां मध्यंतरी एका टप्याचे घोडे एकाएकी बिचकले, आणि एका खोल नाल्याकडे मागें सरकत चालले. पण, बरोबरच्या माणसांनी प्रसंगावधान राखून मोठ्या शिताफीने घोडे थोपून धरले; यामुळे, गाडीचा व मासाहेबांचा बचाव झाला. तारीख २९ आक्टोबर १८९८ रोजी प्रातःकाली त्या बडोद्यास येऊल दाखल झाल्या. परत आल्यावर त्यांचा मुक्काम काही दिवस तारकेश्वरींच होता. तेथे त्यांची प्रकृत काही दिवस साधारण बरी होती;