पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[९८] काही वर्षे अशाच चालू राहतील व त्यांचे स्मरण वाईच्या आसपास पंचवीस तीस कोसांत बरेच दिवस राहील. वाईहून निघतांना वाईच्या सार्वजनिक सभेनें वाईकरांच्या वतीने मासाहेबांना मित्ति अश्विन शुद्ध १३, गुरुवार, शके १८२० चे एक मानपत्र दिले, त्याचा जरूरीपुरता उतारा याखाली देतो. 'महाराणीसाहेबांची स्वारी येथे येऊन आज पांच महिने झाले, व हे सर्व दिवस वाई क्षेत्राला आणि आस- पासच्या पंचक्रोशीला असीबत आनंदांचे गेले, हे कळवि. ण्यास आझांस फार संतोष वाटत आहे. xx ईश्वरभक्ति, सनातन धर्माविषयी पूर्णनिष्ठा, दानशूरता, गोब्राह्मणांविषयी वात्सल्य, विद्वजनांविषयी प्रेम, इत्यादि जे अलौकिक गुण मातुश्रींच्या अंगी वसत आहेत, त्यांच्या योगाने सर्व कोकांना आनंद झाला आहे. x x श्रीमती महाराणीसाहे- बांनी सुवासिनी पूजा, ब्राह्मणसंतर्पण, ब्राह्मणेतरांनाही यथेष्ट पक्कान्नभोजन, सर्व बालकांना मिष्टान्नदान, विद्वज्ज- नांची संभावना, वगैरे जी दानशूरतादर्शक कृत्ये केली, त्यांच्या योगाने महाराणी साहेबांच्या कुलाची किर्ति या क्षेत्रांत चिरकाल राहील यांत संशय नाही.' इत्यादि, इत्यादि. वाईच्या दानधर्माचा तपशिलवार खुलासा बाईचे मोद- वृत्त पत्र ता. २७ अक्टोबर १८९८ चे यांत केला आहे. वृत्तकारांनी प्रत्यक्ष पाहिलेले मासाहेबांचे मोदवृत्त त्यांत दिले आहे. ठोकळ ठोकळ गोष्टींचा गोषवारा मात्र आह्मी दिला आहे. आहीं वाईचे राहणारे खरे, तरी त्या समयीं दूर बडोद्यास