पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[९६ असो, इतकाच उतास बस आहे. याप्रमाणे भोजन प्रिय ब्राह्मणांना वरचेवर यथेष्ट मिष्टान्नभोजने मिळू लागली तेव्हा त्यांना गोडाचा वीट येऊन ते ह्मणूं लागले, घरची शिळी भाकर बरी, पण हे सहस्रभोजनी गोड लाडू आतां नकोत. या हकीकतीवरून मासाहेबांनी फक्त ब्राह्मणांना जेवू घातले, आणि दुसऱ्या जातींना त्या विसरल्या असें मात्र कोणी समजू नये, अतीत, अभ्यागत, अनाथ, पंगू, गोसावी, बैरागी, साधु, संत, कुळंबी, माळी, महार, पोर या सर्वांच्या पंक्तीच्या पंक्ति मेणवली- च्या घांटावर बसवून पंक्तिप्रपंच न करितां कैकवेळां मेन- बानीच्या थाटाची मिष्टान्न भोजने त्यांनी आपल्या देखरेखी- खाली दिली. अन्नदानाने, वस्त्रदानाने व रोकड देणग्यांनी हजारों अनाथांचे अंतरात्मे त्यांनी तृप्त केले. कन्यागतानि- मित्त त्यांनी कृष्णातटाकी फारच मोठा खर्च केला. वाईकडे असतांना मासाहेबांनी धौममहाबळेश्वरचीही यात्रा केली. तेथेही दानधर्म, ब्राह्मणभोजनें व ब्राह्मणेतरां. ना मिष्टान्नभोजने दिली. वाईच्या व वाईच्या आस- पासच्या विद्वान् ब्राह्मणांना शालजोड्या, पीतांबर, धोत्रजोडे व रोकड संभावना देऊन त्यांचा गौरव केला व क्षेत्रस्थ संन्याशांना पुडीला बोलावून छाट्या व कौपिनें दिली. बाई व मेणवली येथील सुखवस्तु, सावकार, इनामदार, गृहस्थ व सरकारी कामदार यांनाही एक दिवस अगत्यपू- र्वक आमंत्रण करून मिष्टान्नभोजनाची मेजवानी दिली. अलीकडे वाईस मासाहेबांच्या प्रकृतीला स्वास्थ्य वाटे. नासे झाले होते ह्मणून बडोद्यास लवकर निघून येण्यासाठी