पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

च०४० येईल. हिने थोरले माधवराव व नारायणराव ह्यांना चांगला उपदेश केला होता. थोरल्या माधवरावांनी कर्नाटकच्या मोहिमेमधून आप- ल्या मातुश्रीस अनेक महत्त्वाची पत्रे पाठविली आहेत, व नाजूक राजकारणांत तिची सल्लामसलत घेतली आहे. हे ऐकून कोणांस कौतुक वाटणार नाही? हिने सवाई माधवरावास पाठविलेले एक उपदेशपत्र काव्येतिहाससंग्रहामध्ये मागें प्रसिद्ध झालेलेच आहे. तें वाचून तिच्या थोर मनाची चांगली कल्पना करितां येईल. छत्रपति व पेशवे ह्या दोन घराण्याशिवाय महाराष्ट्रांतील इतर सरदार घराण्यांतही चरित्रलेखनास योग्य अशा अनेक स्त्रिया निपजल्या आ- हेत. तळेगांवचे दाभाडे सेनापति त्रिंबकराव ह्यांची पनि उमाबाई ही प्रति रणशूर झांशीची राणीच होती, असें झटले असतां अतिशयोक्ति होणार नाही. हिची गणना धनुर्धारीनी रणशूर अबलां' मध्ये केली आहे, ती अगदी यथार्थ आहे. हिची योग्यता शाहू महाराज व बाजीराव पेशवे हे देखील जाणून चुकले होते. शाहू महाराजासा- 'रख्यांस, स्वतः तळेगांवांस जाउन जिची समजावणी करावी लागत असे, व जिला बहुमानपुरस्सर पालखीत बसवून आपल्या राजधानीत न्यावी लागत असे; व बाजीरावासारख्या बाणेदार वीरास जिच्या पायावर आपले डोके नम्र करून वारंवार क्षमा मागावी लागत असे, तिची योग्यता कांहीं अपर्व असलीच पाहिजे ह्यांत शंका नाही. ह्या मानधन स्त्रीने अहमदाबादेवर स्वारी करून तेथील बाबी नामक मुसलमान सुभेदाराचा हत्तीवरून लढून जो पराभव केला, तो इतिहा- सकारांनी कौतुकानेंच वर्णन केला पाहिजे असा आहे. सुभेदार थोरले मल्हारराव होळकर ह्यांना बिकट प्रसंगी युद्धनीति शिकविणारी त्यांची पनि गौतमाबाई, पानिपतच्या मोहिमेमध्ये भा- उसाहेबास आपल्या तेजस्वितेनें व वीर्यशालित्वाने थक्क करून सोड- णारी बळवंतराव मेहेंदळ्याची आई, भीमाशंकराच्या उन्मत्त कोळी लोकांस आपल्या तरवारीच्या तीक्ष्ण धारेने स्वर्ग दाखवून त्यांच्या रक्ताचा कपाळास सौभाग्यतिलक लावणारी व पालखीत बसून वा-