पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[९३] इतर ब्राह्मणांचे कैक वेळां हात भिजल्याशिवाय राहिले नाहीत असे समजते. पाटरांगोळ्या घातलेल्या ब्राह्म- णांच्या पंक्ति जेवावयास बसल्या, झणजे पानांवर पदार्थ वाढविण्याची पैरवी मासाहेब स्वतः तेथे उभ्या राहून ठेव- वीत असत. मग त्या बेताला काय विचारावे ? त्यावेळेस जो भाजीपाला वाईकडे मिळत नव्हता तो बडोदें, मुंबई व पुणे एन रेल्वेमार्गाने आणविण्याची तजवीज ठेवविली होती, असें स्वारीबरोबर गेलेले लोक सांगतात. अशा भो- जनाचा बेत किती सुरेख राहत असेल हे माझी सांग- ण्यापेक्षां द्रौपदीने दुर्वास ऋषि व त्यांचे शिष्य यांना भर- ण्यांत इच्छाभोजन दिल्याचे भारतात सांगितले आहे. स्याचे मुक्तेश्वरांनी रसभरित वर्णन केले आहे. त्याचाच थोडासा उतारा येथे देतो, हणजे मासाहेबांच्या भोजन- समारंभाची कल्पना करितां येईल. (जेवणार मंडळी कशा प्रकारची होती) 'संबळिया देव धोत्रे, शाळिग्राम तर्पणपात्रे, आसने रुद्राक्षमाला सूत्रे, कमंडलू हस्तकीला .(भोजनाचा बेत कसा होता). 'ऐशी लोणची चाखतां ओठी, अरुची पळे बारा वार्टी, जैसे धन्वंतरी याचे दृष्टी, रोग पळती दशदिशा.' 'गाळूनि चंद्रकळांचा रसू, माजी मेळविला सुवासू,