पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[९ ] कोटेश्वर, हरिहरेश्वर ही होत. या शिवाय वाईक्षेत्रात फरसावरचें विष्णुमंदिर, लक्ष्मीमंदिर, ढोल्या गणपती, कसब्यांतील मोरया, इत्यादि अनेक देवस्थाने आहेत. यां पैकी बरीच शिलामंदिरें रास्ते सरदार यांनी बांधलेली फार प्रेक्षणीय आहेत. कृष्णेच्या काठालाच रास्त्यांनी एका शिलामय मंदिरांत गणपतीची स्थापना केली आहे. ती गजाननाची मूर्ति फारच भव्य आहे. एवढी मोठी मूर्ति कोठेही नसेल. तिची पूजा शिडी लावून करावी लागते ! ह्मणूनच त्या मंगल मूर्तीला ढोल्या गणपती असें ह्मणतात. असो. आतां वाईकडे गेल्यावर मासाहेबांनी कन्यागतानिमित्त काय काय दानधर्म केला याची हकीकत पुढच्या खंडांत देऊ. शा THIS राजा