पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१०] कांही गरीब ब्राह्मणमुलींची सालंकृत कन्यादानें केली, व कांहीं गरीब मुलांच्या धर्ममुजी केल्या. धर्म कृत्यांकडे त्यांचे जास्ती जास्ती लक्ष लागत चालले. केळणपुरासही चैन पडेना. मग हवा पालटण्याकरिता दक्षिणेकडे प्रयाण करावें हणजे प्रकृतीस आराम पडेल अशी कित्येकांनी सल्ला दिली ती त्यांना पसंत पडली. कन्या- गतानिमित्त क्षेत्र वाई येथे जावें झणजे हवापालट होऊन श्रीकृष्णाबाईची स्नानें व दानधर्म घडेल असा विचार होऊन त्यांचा वाईकडे जाण्याचा बेत ठरला. मासाहेबांची स्वारी केळणपुराहून वाईकडे जाण्याकरि. तां तारीख २५ मे सन् १८९८ रोजी निघाली. वाईच्या पश्चिमेस एक कोसावर नाना फडणविसांचा लहानसा मेण- वली गांव आहे. तेथें कृष्णेच्या काठी नानांचा दु. मदार वाडा आहे. त्या वाड्यांत त्यांनी आपला मुक्काम ठेविला. मासाहेबांचा मेणवलीस मुक्काम होता तोपर्यंत मेणवली व वाई हे दोन गांव एक होऊन गेले होते. मेण. वलीला मोठ्या गांवाची कळा आली. त्या दोन गावांमध्ये अंतर आहे असे वाटेनासे झाले, इतका तो रहदारीचा हमरस्ता होऊन गेला. - महाबळेश्वरापासून धोम-वाईच्या पंचक्रोशीत शिवालये अगणित आहेत. त्यांमध्ये मुख्य मुख्य मटली ह्मणजे महा- बळेश्वर, धौमेश्वर, सिद्धेश्वर, काशीविश्वेश्वर, काळेश्वर,