पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[८९] त्यांचा अंत झाला. महाराजसाहेब मुद्दाम कर्नाळीस ना- ऊन मातुश्रीसाहेबांचे शांतवन करून त्यांना बडोद्यास घेऊन आले. तेव्हापासून मासाहेबांच्या शरीरप्रकृतीला धक्का बसला तो बसला. अतिआग्रह करून महाराजानी त्यांना आपल्याजवळ बडोद्यास आणिले; पण, त्यांना येथेही चैन पडेना. रात्रंदिवस ताराबाबा डोळ्यांपुढे दिसत होती. झोप उडाली. त्यांच्या मूळ स्वरूपांत पुष्कळच फरक पडला. कन्यावियोगानें शरीर होरपळल्यासारखे झालें. अंगते- जस्विता नाहीशी होऊन अकाली वृद्धावस्थेची कळा आली. मी महापापिणी ह्मणून मला वैधव्य आले, नानाप्रकारची दुःखें भोगावी लागली आणि माझी एकुलती एक ताराबाबा होती तीही मला लाभली नाही, मागल्या जन्मी महा पा- तकें केली असतील त्यांची फळें या जन्मी मी दोनी हातांनी गोळा करीत आहे, असे त्यांना वाटू लागले. हे विचार मनात उभे राहून शंकराचे पूजन, भजन, स्मरण, उपोषणें, दानधर्म, पुराणश्रवण यांमध्ये त्यांचा बहुतेक काळ जाउं लागला. रात्री बिछान्यावर निखारे पसरलेले व पोटांत आगीचा भडका, मग झोप यावी कशी? पुढे बडोद्यास प्लेगचा आजार चालू झाला, सबब डा. क्टरांच्या सांगण्यावरून बडोद्याहून चार कोसावर केळण- पूर ह्मणून गांव आहे, तेथील बंगल्यांत त्यांनी स्थलांतर केलें. ते कन्यागताचें साल होतें, ह्मणून त्या ठिकाणी त्यानी