पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[८] भाही. चित्रांत व तसबिरांत हालचाल उत्पन्न करण्याचा यत्न हल्ली युरोप खंडांत चालू आहे. नुसतें हुबेहुब चित्र करणे किंवा काढणे यांत तिकडे काहीच वाटेनासें झाले आहे !nsaisara s संपतराव गायकवाड यांनी बडोद्यास 'सयाजी लायब्ररी' या नावाची एक मोठी लायब्ररी स्थापन करण्याचा विचार केला; पण, शहरच्या मध्यभागी ती स्थापन करण्या- जोगी प्रशस्त इमारत मिळेना. मासाहेब ज्या राजवाड्यांत रहात होत्या तो वाडा खाली होता; कारण, मासाहेब अली- कडे तारकेश्वरच्या मंदिरांत, अगर मोतीबाग, वगैरे बंगल्यात रहात होत्या. तो वाडा लायब्ररीच्या कामाला मिळावा म्हणून संपतरावांनी मासाहेबांकडे विनंति केली. ती मान्य करून तो वाडा ताबडतोब त्यानी लायब्ररीकरितां खाली करून दिला. सार्वजनिक हिताच्या कामांकडे त्यांचे किती लक्ष असे हे यावरून स्पष्ट दिसून येते. सन १८८९साली ही प्रसिद्ध लायब्ररी त्या वाड्यांत स्थापन झाली. तेव्हापासून तेथील पुस्तकांचा अमत्य लाभ बडोद्याचे सर्व लोक घेत आहेत, याच लायब्ररीत एक मोठा 'आल्बम्' (फोटो- प्राफांचा संग्रह) आहे. त्यांत खंडेरावमहाराज, जमनाबाई साहेब, ताराबाबा व राजघराण्यातील दुसरी इतर मंडळी, यांच्या उत्तम तसबिरा घालून ठेविल्या आहेत. हीर incbf Sessio TOPATEResi sta FDMISSION या NHSSES