पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[८] ते पदार्थ ताटांत वाढलेले असले म्हणजे त्या दिवशी त्या दोन घासांनी जेवण अधिक जेवीत. लि सुगंधि अत्तरांमध्ये हीना अत्तरावर त्यांची भक्ति विशेष असे. दुसरी अत्तरें त्या फारशी वापरीत नसत. रंगांमध्ये मोतिया, प्याजी, अस्मानी, तुरंजी, खसखसी, पोपटी हे रंग त्यांना आवडत. दागिन्यामध्ये हिरा-मोत्याचा दागी. ना विशेष आवडे. n p का सर टी. माधवरावांनी आपल्या कारकिर्दीत 'जमनाबाई हॉस्पिटल ' या नांवाची मासाहेबांच्या स्मरणार्थ एक दवाखा- न्याची इमारत जीत हल्ली सेनापतीकचेरी आहे ती बांधविली. तिजकडे दीड लाख रुपये खर्च झाले. ती इमारत सन १८८२ साली पुरी झाली, असें तिजवरील स्मारक लेखावरून सम- जते. तिची हकीकत दिवाणांनी सन १८८० सालच्या वा- र्षिक रिपोर्टात दिली आहे. तेव्हांपासून मासाहेबांच्या नांवाचा धर्मार्थ दवाखाना उघडून त्याजकडे दरसाल सुमारे दहा हजार रुपये खर्च होत आहेत. ही इमारत फारच संदर आहे. या स्मारकाच्या योगानें हजारों अनाथ व गरीब मनुष्यांना धर्मार्थ दवा व पोटाला अन्नही मिळत आहे. मासाहेबांचे आता प्रत्यक्ष दर्शन होणे नाही, परंतु प्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा याने त्यांच्या व ताराबाबांच्या ऑइलपेंटिंगच्या मोठ्या सांच्याच्या सर्वांगसुंदर तसबिरा काढल्या आहेत, त्या लक्ष्मीविलास व मकरपुरा राज. वाड्यांत ठेविल्या आहेत. त्या पाहिल्या असता त्यांचे दर्शन घडल्यासारखे वाटते. त्यांत त्यांची हालचाल मात्र