पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[८४] ठेवून तराजू उचलली, तो इंद्राचे वजन आपल्या पासं- गालाही पुरले नाही. आपलें पारडे जड असल्यामुळे तें खाली बसून राहिले, आणि इंद्राचे पारडे हलके म्हणून ते वर उडालें. मग इंद्र वरच्या वरच राहिला. एका कवीने एकदा एका श्रीमंत गृहस्थाला स्तुतिपर कवनानें खुष केलें. मग तो गृहस्थ म्हणाला,-'कविराज, उद्या तुम्ही मजकडे या म्हणजे मी तुम्हाला खुष करीन' दुसऱ्या दिवशी तो कवि मोठ्या आशेने त्याजकडे जाऊन संभावना मागू लागला. तेव्हां तो श्रीमंत गृहस्थ म्हणाला, 'तुम्हाला द्यावयाचे ते मी कालच देऊन चुकलो आहे. तुम्ही कवनांत माझी स्तुति करून मला खुष केले, तसे तुम्ही उद्यां या असे सांगून मी ही तुम्हाला खुष केले. झाले, खुषीनें खुषी उडाली. आतां द्यायचे घ्यायचे काही राहिले नाही' हे ऐकून कविराज मुकाट्याने चालते झाले. मासाहेबांना गोड पदार्थ फारसे आवडत नव्हते. त्यांची आंबट पदार्थांवर भक्ति फार असे. आंबा, महाळुग, लिंबू, यांची लोणची त्यांना फार आवडत. कवठावर त्यांचे प्रेम फारच असे. पुरणाची पोळी व श्रखिंड त्या विशेष आदराने खात. कोणी त्यांना मेजवानी केली तर कवठाची चटणी, खुसखुशीत थालिपीट, बाजरीची भाकर, वाटाण्याचे सांभारें व चक्का दही, हे पदार्थ ताटांत वाढलेले पाहिले म्हणजे त्यांची मर्जी सुप्रसन्न असे, म्हणून मेजवानी करणारे इतर मिष्टान्नांबरोबर त्यांना आवड- णारे पदार्थ करून वाढण्याची अगोदर तजवीज ठेवीत.