पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्त्रीरत्नांची माहिती चिटणिसी वगैरे बखरीत थोडीशी आलेली आहे. ती वाचून कोणाचेही चित्त हर्षभरित झाल्यावांचून रहाणार नाही. ह्या स्त्रियांच्याच योग्यतेच्या दुसऱ्या स्त्रिया राजारामाची पत्नि सुप्र- सिद्ध ताराबाई, तिची सून जिजाबाई, थोरले शाहू महाराज ह्यांच्या राण्या सकवारबाई व विरुबाई ह्या होत. ह्यांची चरित्रे निरनिराळ्या दृष्टीने महत्त्वाची असून फार मननयोग्य आहेत. दर निर्दिष्ट के- लेल्या शाहू महाराजांच्या दोन राण्या मराठी राज्याच्या अभ्युदयास इतक्या साहाय्यभूत झाल्या आहेत की सांगतां सोय नाही. छत्रप- तींच्या राण्यांनी मोठमोठ्या राजकारणांत मन घालून नाजूक मनसबे सिद्धीस नेल्याची माहिती कोणास ठाऊक देखील नसेल! परंतु महापुरुष ब्रह्मेद्रस्वामी धावडशीकर ह्यांचा जो पत्रव्यवहार उपलब्ध झाला आहे, त्यावरून मनास थक्क करून टाकणान्या ह्या स्त्रियांच्या राजकारणाचा बराच प्रकाश बाहेर येतो. ह्या खद्द छत्रपतींच्या घराण्यातील स्त्रिया झाल्या. ह्याप्रमाणेच पेशव्यांच्या घराण्यांतही काही चरित्रलेखनयोग्य स्त्रिया होऊन गेल्या. बाळाजी विश्वनाथाची बायको राधाबाई हिचे चरित्र तर फारच अपूर्व आहे. हिच्यासारखी दरदशी, राजकारणकुशल, प्रसंगावधानी आणि सुसंस्कृत मनाची स्त्री इतिहासांत क्वचित् पडेल. शिवाजी उत्पन्न होण्यास ज्याप्रमाणे जिजाबाई कारण झाली, त्याप्रमाणे बाजी- राव उत्पन्न होण्यास राधाबाई कारण झाली, असे मोठया गर्वाने ह्मणतां येईल. ह्या स्त्रीची माहिती मराठी बखरीमध्ये नुसत्या ना- मोल्लेखापेक्षा अधिक मिळत नाही. बाजीरावाच्या व चिमाजी- राक्रमातिशयाचे वर्णन करण्यापूर्वी ह्या स्त्रीचे चरित्र अवश्य ध्यानात घेतले पाहिजे, इतकें तें महत्त्वाचे आहे. तिच्या शिक्षणाचा परिणाम ह्या दोन रणशर महाराष्ट्वीरांवर कसा झाला हें समजले, तर मराठी राज्य तयार करण्यास जिजाबाई व राधाबाई ह्या स्त्रियाच कारण झाल्या, असें साश्चर्य व सानंद कबूल केले पा- हिजे, राधाबाईच्या खालच्या वर्गात गोपिकाबाईची गणना करितां