पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

LIBRARY.KHA [ RGENERAL ITRA (सार्बजनिक यातालय पाखंड २० खेड, चार गोष्टी वगैरे. wwand मासाहेबांच्या तैनातीत एक गोष्टी सांगणारा होता. त्याला रावजी गोष्टी हे नाव पडले होते. राजे लोक व राजस्त्रिया यांच्या तैनातीला असे गोष्टी सांगणारे लोक अस- तात. त्यांचे काम इतकेंच की त्यांना करमेनासे झाले, किंवा झोप येत नसली तर पलंगाजवळ बसून करमणु- कीच्या काही गोष्टी सांगाव्या, आणि झोप लागली की निघून जावें, अलीकडे ताराबाबा वारल्यापासून मासाहेबांची झोप उडाली होती; यामुळे, रावजीच्या चटकदार गोष्टी ऐकतां ऐकतां थोडीशी झोप लागली तर लागे. असे सांगतात की, त्याच्या गमतीच्या गोष्टी ऐकतांना कसलेही दुःख क्षणभर विसरून जात असे, असा रावजीच्या अंगी गुण होता. अशा गोष्टी सांगणाऱ्याच्या तोंडी बहुशः बिरबल बाद- शहाच्या गोष्टी असतात. तसले एक दोन चटके एथे देतो. एकदां अकबर बादशहाने बिरबलाला विचारिलें-'मी मोठा की तुमचा इंद्र मोठा?' बिरबलाने उत्तर दिलें-आ- पण मोठे, इंद्र अगदी हलका.' बादशहाँ म्हणाला-'मी मोठा कसा ते सांग.' बिरबल म्हणाला-'ब्रह्मदेवानें भाप- त्याला उत्पन्न केल्यावर एक मोठी तराजू हाती घेऊन एका पारड्यांत इंद्राला व दुसया पारड्यांत आपल्याला