पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- - राहून त्या क्षणभर चकित झाल्या. त्याचे साडेतीम हात लांबीचे शांत थडगें* पाहून त्यांना फार आश्चर्य वाटले. in मासाहेबांचा गोकर्णाकडे मुक्काम असतांना सांवतवाडीहून ताराबाबाकडून कांहीं मानकरी त्यांस बोलवावयास आले. त्याप्रमाणे त्यांनी तिकडे जाण्याचे कबूल केले. नंतर रेलवे मार्गाने बेळगांवापर्यंत जाऊन अंबोलीच्या घाटाने त्या सांव. तवाडीस गेल्या. स्वारीबरोबर सुमारे २०० मनुष्ये होती. तेथे गेल्यावर मोठ्या थाटाने स्वारीचा शहरांत प्रवेश झाला. जावई व कन्या यांच्या घरी सुमारे एक महिनाभर मासा- हेबांचा मुक्काम होता. तेथें जामाताकडून मासाहेबांचे चांगले. आदरातिथ्य झालें. सांवतवाडीहून बेळगांवाकडे पायरस्त्याने

  • गोव्यापासून तहत दमणपर्यंत हिंदुस्थानचा बहुतेक पश्चिम

किनारा फिरंगी लोकांनी व्यापून टाकिला होता. तेथे त्यांनी हिंदु लोकोमा बाटविण्याचा मोठा सपाटा चालविला होता. त्यांनी जुल- माने लोकांचे धर्मातर करविले. हजारों हिंदु भ्रष्ट केले. हजारों ब्राह्मण व मराठे यांना देशोधडीस लाविलें. गावोगांवचे लहानमोठे तलाव व विहिरी यांत धुंकून व हाडे टाकून त्या भ्रष्ट केल्या. भले अत्याचार करून वासकोडिगामाने हिंदु लोकांस'त्राहि भगवान' करून सोडले होते. ही सर्व हकीकत मासाहेबांनी इतिहासांत वाचली होती. धर्माचा मूळ इतिहास पाहिला तर अगदी मूळचा वेदधर्म, किंवा हिंदुधर्म होय. या धर्मापासूनच परंपरेनें, परंतु थोड्या बहुत विप- र्यासाने मरथुष्ट' झणजे पारशी धर्म व बौद्धधर्म निपजले. बौद्ध धर्मापासून ख्रिस्ती धर्म प्रसपक्षा, आणि ख्रिस्ती धर्मापासून इस्. काम अणजे मुललमानी धर्म निपजला. अशा क्रमाने पृथ्वीवरचे निरनिराळे धर्म पसरले. अशी परंपरा भसून निस्ति-धर्मानुयायी फिरंगी यांनी गोव्याकडे त्यासमयीं धर्माभिमानाने फारच कहर करून सोडला होता..