पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अत्यंत निष्टा असल्यामुळे वाटेंत शरीराला कितीही कष्ट सोसावे लागले तरी ते त्यांनी शांतवृत्तीने सहन केले. क्यासलॉकपासून गोव्यापर्यंत पोटुगीज सरकारची हद आहे, मार्गात दाट जंगल लागले. काही ठिकाणी भयं. कर किर्र झाडी होती. दुतर्फा गगनचुंबी वक्ष लागून गेले होते. कोठे कोठे सूर्याचे किरण आंत शिरण्यालाही फट नव्हती. अशा भयंकर अरण्यांतून लहान मोठचा नद्या वहात होत्या. आसमंतात् हिरवीगार दाट छाया असत्या. मुळे ते सर्व अरण्य शांत वनश्रीचे निवांत स्थान बनून राहिले होते. त्या वनभूमीचे अप्रतिम सौंदर्य पाहून मासाहेबांना परा. काष्टेचा आनंद वाटला. तिचे नानात-हेचे पोषाक पाहून त्या फार चकित झाल्या. त्यांनी बाणभट्टाची कादंबरी, सुबंधुची वासवदत्ता, गीतगोविंद, वगैरे काव्ये व कादंबऱ्या वाचल्या होत्या. त्यांचे स्मरण होऊन त्या आपल्या बरो- बरच्या मंडळीला ह्मणाश्या-'कादंबरीकारांनी आपल्या पुस्त- कांत जी अरण्यांची वर्णने दिली आहेत बी खरी अस- त्याची प्रचीती आज याठिकाणी मला आली.' गोव्याकडे मासाहेबांचा मुक्काम होना तोपर्यंत त्या सर- काराने त्यांचा मानमरातब फार चांगला ठेविला होता. पोर्तुगीज लोकांचा मूळ पुरुष वास्कोडिगामा याचा वृत्तांत त्यांनी वाचला होता. या ऐतिहासिक साहसी पुरुषाचे थडगें जुनें गो येथे आहे. ती जागा त्या पहावयास गेल्या होत्या, त्यावेळेस त्याचे भयंकर चरित्र त्यांच्या डोळ्यापुढे उभे