पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[७९] र है वर्णन वाचून गोकर्णमहाबळेश्वराचे दर्शन की होईल असे त्यांना झाले होते. या वर्णनावरून हे देव- स्थान फार प्राचीन, ह्मणजे रामावताराच्या अगोदरपासून प्रसिद्ध होते, असे अनुमान निघते. मासाहेब गोकर्णास जाऊन पोहोंचल्या त्यावेळेस माघ बद्य १४ ची महाशिवरात्रीची पर्वणी नजिक येऊन पोहों- चली होती. जलदीचा प्रवास करून ती संधि त्यांनी सा- धली. गोकर्णास त्यांचा मुक्काम तारिख १३ पासून तारिख २५ फेब्रुवारी १८९६ पर्यंत तेरा दिवस होता. या आब- काशांत त्यांनी तेथें पुष्कळ दानधर्म केला. शिवरात्रीच्या दिवशी त्यांनी श्री महाबळेश्वराची महापूजा करविली. रात्री पूजा झाल्यावर सांप्रदायाप्रमाणे वाजत गाजत श्रीचा रथ मोठ्या समारंभाने निघाला. रथापुढे ब्राह्मणांचा वेद- घोष न मारांगनांचे नृत्य होत होते. मासाहेबांनी सोन्यारुप्याची एक शालुका करयूम श्री शंकराला अर्पण केली. शिवरात्रीच्या पारण्याला मुक्तद्वार मिष्टान्न भोजन घालून ब्रह्मवृंद तृप्त केला, व इतर अनाथ, पंगु, दरिद्री, साधुसंत, वगैरे यांसही मिष्टान्न भोजन घालून सर्व वर्णास संतृप्त केले. श्रीला नंदादीप व पूजा नैवेद्याबद्दक त्यांनी वर्षासन बांधून दिले. त्याप्रमाणे दरसाल त्यांजकडून देवस्थानाकडे रकम जात होती. स्वारीचा मु- काम गोकर्णास होता तोपर्यंत रोज अन्नसंतर्पण चालू होते. ही गोकर्णाची यात्रा फार कष्टप्रद आहे असे त्यांना पूर्वीच कळमें होतें. तरी श्री शंकराच्या ठिकाणी त्यांची