पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[७७] खंड १९. T गोकर्ण यात्रा. - woman- सन १८७७ साली मासाहेब दिल्लीच्या दरबारास गेल्या होत्या. तेथून परत येतांना त्यांनी काशी, प्रयाग, वगैरे उत्तर हिंदुस्तानच्या तीर्थयात्रा केल्या. पुढे श्रीरामेश्वर व गोकर्ण महाबळेश्वरच्या यात्राही करण्याचा त्यांचा मानस होता. श्रीरामेश्वरयात्रेचा योग घडून आला नाही; पण, सन १८९६च्या साली त्यांनी गोकर्ण महाबळेश्वरची यात्रा केली. प्रथम त्या रेल्वेमार्गाने गोव्याच्या हद्दीतील मार्मे गांव स्टेशनावर उतरल्या. तेथून पुढे आगबोटीत बसून जकमार्गाने गोकर्णास जाऊन पोहोचल्या. या गोकर्ण क्षेत्रांविषयीं स्कंध पुराणांपैकी ब्रह्मोत्तरखंडांत विस्तारपूर्वक वर्णन दिले आहे ते मासाहेबांनी ऐकिलें होतें. त्या नेहमी शिवलीलामृत वाचीत असत. त्यांत श्रीधरांनी गोकर्णाचें महात्म्य व माहिती अशी दिली आहे:- 'गौतम ह्मणे परम पवित्र । भूकैलास गोकर्ण क्षेत्र ।। तेथूनि मी आलो अपार ।। महिमा तेथीचा न वर्णवे ॥१॥ त्या गोकर्णीचे शिवदर्शन । ब्रह्मादिकां दुर्लभ जाण । तेथे इंदिरासहित जनार्दन । तप गहन आचरित ॥२॥