पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[७] शहरांत कळले तेव्हा त्यांचे प्रेम आठवन गेली आमची अन्नदाती मातुश्री' असे लोकांच्या तोंडन उद्गार निघाले. शरीराप्रमाणेचमासाहेबांचें अंत:करणही फार कोमल होतें. कोणी दीन, अनाथ, पंग, थोटा, व्याधिग्रस्त मनुष्य दृष्टीस पडला म्हणजे त्याचा त्यांना कळवळा येत असे. तो कळ- वळा त्यांच्या मुखातून दुःखाने ओलें चिंब झालेल्या शब्दां- च्या रूपाने बाहेर पडे, इतकेच नाही; पण, त्याचे साह्य करण्यास त्यांचे मन द्रवन धर्म करण्यासाठी हातांची बोटें शिवशिवं लागत. अनाथाचा समाचार घेऊन त्याला वाटेला लावीत. त्यांचं भूतदया पुष्कळांना माहीत आहे. भूतदये- च्या व उदारपणाच्या गोष्टी सांगायला व ऐकायला सोप्या असतात; पण, स्वतः करण्याची पाळी आली म्हणजे फार कठीण जाते. अहल्याबाईसारखी जी असाधारण उदार माणसे आपल्याकडे होऊन गेली, त्यांचा औदार्य हा गुण उपजतच स्वभाव होता. मात्र त्याला सतत अभ्यासाने पुष्टि आली होती. जोपर्यंत पदराला खार लागत नाही तोपर्यंतच औदार्यबुद्धीचे प्रवाह वाहतात; परंतु स्वतः देण्याचा प्रसंग आला म्हणजे ते प्रवाह आटन जाऊन त्यांचे उग- मही नाहीसे होतात! - मासाहेब सयाजीराव महाराजांना 'बाळा, बाळा' म्हणत. आले नाहीत. त्या मागतील तो पैसा ते त्यांना उदार हस्ताने पुरवीत असत. मासाहेबांच्या हातखर्चासाठी साली- ना पन्नास हजार रुपये मिळत होते. शिवाय इतर कचा खर्च चालत होता. हिंदुधर्माप्रमाणे त्यांची देव-ब्राह्मणांच्या ठि-