पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[७४ मंदिरांतून संध्याकाळी बाहेर निघाली झणजे दारूकाम सुटत होते. ____ मासाहेब पक्षप्रदोष, महाशिवरात्र, महाएकादशा या दिवशी उपोषणे करीत. श्रीतारकेश्वरमंदिरांत प्रदोषा- च्या दिवशी व सोमवारी, प्रदोषकाली, स्नान करून पांढरौं वस्त्रे परिधान करून कपाळाला भस्म लावून गळ्यांत ब हातांत रुद्राक्षमाला धारण करून श्रीशंकरापुढे त्या ध्यानस्थ होऊन बसत, तेव्हां ह्या कोणी तपस्विनी आहेत असें याटे. त्यांच्या कठांतील मुक्ताहारापेक्षा दया, दाक्षिण्य, औदार्य, ईश्वरभक्ति, इत्यादि गुणांनी त्यांच्या शरीराला अधिक शोभा दिसे. मंदिरांतील हंड्या झुंबरांची व दीपा- वलींची रोषनाई गायन, भजन व कीर्तन यांचे आलाप; सुगंधी पुष्पांच्या व पल्लवांच्या लटकणाच्या माळा; केळींची मखरें; मंत्रपुष्पाचा गजर; सूरसनयांचे मंजुळ आवाज; देव- दर्शनासाठी आलेल्या लोकांची दाटी; हे सर्व देखावे बडो- 'यांतील पुष्कळ लोकांच्या स्मरणांतून पुष्कळ दिवस नाहीसे होणार माहीत. एकदां तारकेश्वरी भोजनास पंक्ति बसविल्या होत्या. त्यांचे वाढप बरोबर झाले आहे की नाही, हे त्यांनी स्वत: जाऊन पाहिले, तो पुढच्या पंक्तीला सर्व पदार्थ बरोबर वाढले असून दुसऱ्या बाजूच्या किरकोळ पंक्तीला पंक्तिप्रपंच केलेला दिसला, तेव्हां ज्याची कसूर होती त्याला त्यांनी दंड केला आणि सर्वांना सारखें वाढप होईपर्यंत त्या तेधन हालल्या माहीत. अशी त्यांची सर्वाविषयी सारखी नजर होती. मासाहेब कैलासवासी झाल्याचे वर्तमान