पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[७१] परिपूर्ण करो; व मासाहेबांनी बांधून दिलेल्या नवीन 'लक्ष्मी- विलास' राजवाड्यांत महाराजसाहेब, त्यांच्या राणीसाहेब व अपयें सुखाने नांदोत. - लक्ष्मीविलास राजवाड्याचे सगळे काम दगडी आहे. आंत मासाहेबांच्या सांगण्याप्रमाणे राजकुटुंबाला लागणा- ज्या सर्व सोई करून दिल्या आहेत. असा उत्तम वाडा सगळ्या हिंदुस्थानांत कोठेही नाही, असें ह्मण- तात. वाड्याच्या पायाचा दगड बसविण्याचा समारंभ तारीख १२ जानेवारी १८८० साली मि. मेलव्हिल सा. हेबांच्या हाताने झाला. त्या वेळेस ते ह्मणाले-या राजवा- ड्यांत कोणकोणत्या सोई असल्या पाहिजेत याजबद्दल अगोदर मासाहेबांची सल्ला घेऊन नकाशा तयार केला. तो यांनी पसंत केल्यावर बाड्याच्या कामाला सुरवात कर- ण्यांत आली. त्यांत एक मोठा दरबार हॉल केला आहे. त्याची लांबी ९३ फूट व रुंदी १४ फूट ठेविली आहे. स्याच्या खालच्या व वरच्या मजल्यावर मिळन एक हजार मनुष्ये बसू शकतील, एवढा मोठा हॉल केला आहे. या बाडयाकडे अजमासे वीस लाख रुपये खर्च झाला आहे. - सर टी. माधवराव यांनी मासाहेबांचे नजरेखाली सुमारे साडेसहा वर्षे दिवाणगिरीचे काम केलें. बाप व गुरु यांना पुत्र व शिष्य यांजकडून पराभव झालेला आवडतो, असें झणतात. सर टी. नां साम्राज्य चालविण्याचा अभ्यास झालेला. मुखत्यारी मिळेपर्यंत ते महाराजांना वेळेची किं- मत पढवीत होते; परंतु, उतारवयाच्या कारणाने राज्य- कारभाराची कामें वेळच्यावेळेस न उठली तर उलट आप.