पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[७०] हा आमचा हेतु सिद्धीस नेण्याच्या कामी आमचे सर्व कामदार, दरकदार व प्रजा अत्यंत राजनिष्ठेने आमच्याशी वर्तन ठेवतील असा आह्मी भरंवसा ठेवितों. आज आरंभलेले कार्य ईश्वरकृपेनें सफल होवो.' हे शब्द लक्षात ठेवून राज्यकारभाराचे धोरण सुमारे अठरा वर्षांपासून त्यांनी चालू ठेविलें आहे. आधिकार-दान-समारंभ झाल्यावर कर्नल मीड यांस मा. साहेबांनी एक पत्र लिहिले त्यांत त्यांनी कळविले की 'हिंदु. स्थान सरकाराने मेहेरबान होऊन चिरंजीव बाळासाहेब सुयोग लवकर पहावा अशी माझी इच्छा होती ती आज पूर्ण झाली आहे. मा एकंदरीने विचार केला तर महाराजांचे सादृश्य बज्याच अंशी अकबर बादशाहाशी जुळतें. अकबर आपल्या वयाच्या तेराव्या वर्षी दिल्लीच्या गादीवर बसला. सयाजीरावही तेराव्या वर्षांच बडोद्याच्या गादीचे मालक झाले. अकबराने एकुणी- साव्या वर्षी बादशाईचा कारभार आपल्या शिरी घेतला. त्याच वयांत महाराजसाहेबांस बडोदें राज्याचा पूर्ण भ- धिकार मिळाला. अकबराने जाहीरनामा प्रसिद्ध करून आपल्या प्रजेला आश्वासन दिले. तसेच महाराजांनीही राज्याधिकार मिळाला त्या दिवशी भर दरबारांत आपल्या प्रजेस लेखी व तोंडी आश्वासन दिले. यापुढे मासाहे. बांच्या मागे सयाजीरावांची कीर्ति अंकबराप्रमाणे चिरकाल राहो अंशी गायकवाडी प्रजेची इच्छा आहे ती परमेश्वर