पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खंड १७. mes Parib राज्याधिकार सोंपला.hths ताराबाबांचे व महाराजांचे लग्न झाल्यावर महाराजांना राज्याधिकार मिळावा असें मासाहेबांच्या मनांत आले. महा. राजांना अठरावें सरून एकुणीसावें वर्ष लागले होते. त्यांचा इंग्रजी, मराठी व गुजराथी भाषांचा अभ्यास बराच साहेबांच्या कानावर घातली. एजंटसाहेबांची संमति मि- ळून तिकडून हिंदुस्थान सरकाराकडे लिहून गेले. त्यांनी महाराणी सरकारची परवानगी घेऊन सयाजीराव महाराजांस राज्याचा अधिकार देण्याचे मंजूर केलें. तारीख २८ डिसेंबर १८८१ या दिवशी बडोद्यास मोठा दरबार भरून मुंबईचे गव्हरनर यांच्या हातून महाराज, साहेबांस राज्याचा पूर्ण अधिकार मिळाला. राज्याधिकार स्वाधीन झाल्यावर महाराजसाहेबांनी दरबारांत भाषण केले, तें असें:- आज मित्तीपासन बडोदें राज्याचा अधिकार आयीं आपल्या हाती घेतला आहे. आमची प्रजा सुखी रहावी व दिवसेंदिवस तिच्या सुखाची वृद्धि व्हावी अशी भामची अंतःकरणापासून इच्छा आहे.