पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मला तुमची मुखस्तुति नको. माझ्या पश्चात् मका कोणी काही ह्मणो. त्याची मी पर्वा करीत नाही.' FIRE ( ख ) REPागारमा _मासाहेबांच्या कारकीर्दीत बडोद्यास कर्नल बार पासून मि. मलेव्हिल पर्यंत पांच एजंट होऊन गेले. या एजंट पंचकाच्या नांवांवरून बडोद्याच्या लोकांनी एक श्लेषार्थसू- चक गद्यरचना केली, ती अशी:-'कर्नल बारने बार उडविला, कर्नल फेयरने फिरविलें, सर पेलीने पिरगळून टाकलें, सर मीडनें मिटवीलें, आणि मि. मेलव्हिलने मि. ळवून घेतले.' ही आख्याइका अद्यापि पुष्कळ लोकांच्या तोंडी आहे. बार कसला उडविला? फिरविलें काय? पिरगळलें काय? मिटावलें काय? आणि मिळवून घेतले काय? याचा गूढार्थ बडोद्याची स्थित्यंतरें ज्यांनी पाहिली होती त्यांच्या लक्षांत ती सहज येण्यासारखी आहेत. (ग) मासाहेबांनी पुष्कळ पोथ्यापुराणें ऐकिली होती. त्या- वरून त्यांची अशी समजूत झाली होती की, संपूर्ण जग हे एक प्रचंड नाटक आहे. त्याचा सूत्रधार परमेश्वर आहे. इकडच्या नाटकांत कोणी राजा होतो, कोणी राणी बनते, कोणी दिवाण होतो, कोणी चोपदार बनतो, कोणी अप- राधी बनून न्यायासनापुढे हात जोडून उभा राहतो, अशी रंगभूमीवर नाना त-हेची सोंगे येतात. ती सूत्रधाराच्या आज्ञेत असतात. खेळ आटपला की, ती पडद्याच्या आत जातात. असे आपण प्रचारांतलें नाटकांत पाहतो. तशी